अमित शाह यांच्या बैठकीत होणार निर्णय

BCCI अध्यक्षपदावर कोण ?

भारतीय क्रिकेटसाठी 28 सप्टेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याच दिवशी बीसीसीआयच्या सर्वोच्च पदाधिकारी पदांची निवड होणार असून, सर्वांच्या नजरा अध्यक्षपदावर खिळल्या आहेत. माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्याने पुढील अध्यक्ष कोण होणार, याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.सध्या उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, नवा अध्यक्ष कोण होणार यावर शिक्कामोर्तब दिल्लीतील एका महत्त्वाच्या बैठकीत होणार आहे.

दिल्लीमध्ये होणार निर्णायक बैठक

क्रिकबझच्या वृत्तानुसार, 20 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बीसीसीआय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील अध्यक्षपदाबाबत अंतिम चर्चा होऊन निर्णय निश्चित होण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा मात्र 28 सप्टेंबरला अपेक्षित आहे.

कोण आहेत शर्यतीत?

  • सौरव गांगुली : माजी अध्यक्ष, ज्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.

  • हरभजन सिंग : माजी फिरकीपटू, सध्या राजकारणात सक्रीय; त्यांचं नावही चर्चेत.

  • रघुराम भट्ट : कर्नाटकचे माजी कसोटीपटू.

  • किरण मोरे : माजी यष्टीरक्षक; ते एजीएमचे प्रतिनिधी नसले तरी नियमांनुसार त्यांना संधी मिळू शकते.

पुढील प्रक्रिया

बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी ए. के. जोति यांच्या अधिसूचनेनुसार, 19 सप्टेंबरपर्यंत राज्य संघटनांना एजीएमसाठी प्रतिनिधी बदलण्याची परवानगी आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी अंतिम नाव ठरवण्याची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात आली आहे. 28 सप्टेंबरला होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/social-mediavar-viral-wideo/