आम्ही बोलायला खंबीर! अजित पवारांनी केली मिटकरी आणि हाकेंची कानउघाडणी

आम्ही बोलायला खंबीर! अजित पवारांनी केली मिटकरी आणि हाकेंची कानउघाडणी

मुंबई : पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि लक्ष्मण हाके यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे.

Related News

यावेळी टीका करताना त्यांच्या भाषेचा स्तर देखील खालावल्याचे दिसून आले.

यावरून अजित पवारांनी हाके आणि मिटकरींची कानउघाडणी कर्ली असून एकत्र येण्याबाबत आम्ही बोलायला खंबीर आहोत,

अशी तंबीच अजित पवार यांच्याकडून दोघांनाही देण्यात आली आहे. तर काहीजण जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत,

अशी टीकाही अजित पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली आहे. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार

यांच्यावर प्रखर टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आक्रमक झाले.

लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी

अशी मागणी देखील करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/chief-minister-akola-dahyawar-ubatha-gatachaya-adhiquariya-polisankadun/

Related News