American Delta Force म्हणजे काय? जगातील सर्वात गुप्त आणि घातक अमेरिकन सैनिकी युनिटची संपूर्ण माहिती
सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात American Delta Force हे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात असल्याचा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर, या कथित कारवाईमागे American Delta Force असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, ही American Delta Force नेमकी आहे तरी काय, आणि ती इतकी गुप्त का मानली जाते?
American Delta Force म्हणजे काय?
Delta Force ही अमेरिकन लष्करातील सर्वात गुप्त, अत्यंत प्रशिक्षित आणि घातक अशी स्पेशल ऑपरेशन युनिट आहे. या फोर्सचे अधिकृत नाव Special Forces Operational Detachment – Delta (SFOD-D) असे आहे. सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास, जिथे CIA, FBI किंवा Navy SEALs यांच्यासारख्या यंत्रणादेखील अपयशी ठरू शकतात, अशा अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मोहिमांसाठी American Delta Force ला पाचारण केले जाते.
ही फोर्स प्रामुख्याने High Value Target Capture, दहशतवादविरोधी कारवाया, राष्ट्राध्यक्ष पातळीवरील गुप्त मोहिमा, बंदी बनवलेल्या नागरिकांची सुटका तसेच शत्रू राष्ट्रांमधील अत्यंत गुप्त ऑपरेशन्ससाठी वापरली जाते.
American Delta Force ची स्थापना कधी झाली?
Delta Force ची स्थापना 1977 मध्ये करण्यात आली. 1970 च्या दशकात जगभरात विमान अपहरण, दहशतवादी हल्ले आणि राजकीय नेत्यांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्या काळात ब्रिटनची SAS (Special Air Service) ही फोर्स अत्यंत प्रभावी मानली जात होती. अमेरिकेलाही अशीच एक अत्यंत प्रशिक्षित, गुप्त आणि कठोर कारवाया करणारी फोर्स आवश्यक होती. याच पार्श्वभूमीवर American Delta Force ची निर्मिती करण्यात आली.
Delta Force मध्ये कोण सामील होऊ शकतो?
Delta Force मध्ये थेट भरती होत नाही. या युनिटमध्ये सामील होण्यासाठी आधीच अमेरिकन लष्करामधील अनुभवी सैनिक असणे आवश्यक असते. विशेषतः Rangers, Green Berets आणि Infantry युनिटमधूनच सैनिकांची निवड केली जाते. उमेदवारांची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासण्यासाठी अत्यंत कठीण चाचण्या घेतल्या जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, 100 सैनिकांपैकी केवळ 5 ते 7 सैनिकांचीच निवड केली जाते. ही निवड प्रक्रिया इतकी कठोर असते की अनेक अनुभवी सैनिकही त्यात अपयशी ठरतात.
American Delta Force चे प्रशिक्षण किती कठीण असते?
Delta Force Training हे जगातील सर्वात कठीण प्रशिक्षणांपैकी एक मानले जाते. या प्रशिक्षणाचा कालावधी साधारणतः 6 ते 8 महिने असतो, मात्र काही वेळा तो वर्षभरही चालतो.
या प्रशिक्षणामध्ये सैनिकांना 100 किलोमीटरचा पायी प्रवास, झोप न देता सलग मोहिमा, अन्नाविना अनेक दिवस काम करणे, अंधारात लक्ष्यभेद, Hostage Rescue Simulation आणि मानसिक छळाच्या चाचण्या दिल्या जातात. या काळात अनेक सैनिक मानसिकदृष्ट्या खचून स्वतःहून प्रशिक्षण सोडून देतात, असेही सांगितले जाते.
Delta Force कडे कोणती शस्त्रास्त्रे असतात?
Delta Force कोणतेही अत्याधुनिक शस्त्र वापरण्याची मुभा असते. मात्र प्रामुख्याने सायलेंसर असलेल्या पिस्तुल, अत्याधुनिक रायफल्स, ड्रोन, नाईट व्हिजन गॉगल्स आणि सिक्रेट कम्युनिकेशन उपकरणे यांचा वापर केला जातो. शत्रूला आवाज येण्याआधीच निष्प्रभ करणे, हे या फोर्सचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.
Delta Force च्या गुप्त मोहिमा
Delta Force च्या बहुतांश मोहिमा आजही गुप्तच आहेत. मात्र काही मोहिमा चर्चेत आल्या आहेत. त्यामध्ये इराकमध्ये सद्दाम हुसेनचा शोध, अल-कायदाच्या नेत्यांचा खातमा, अफगाणिस्तानातील गुप्त ऑपरेशन्स तसेच मध्यपूर्वेतील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या कारवायांचा समावेश आहे. अनेक देशांमध्ये Delta Force अस्तित्वात असल्याची शंका व्यक्त केली जाते, मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत कबुली दिली जात नाही.
Maduro Captured प्रकरणामुळे चर्चा
व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात असल्याचा दावा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर American Delta Force पुन्हा चर्चेत आली असून, CIA आणि Pentagon यांनी यावर मौन बाळगले आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा दावा खरा ठरला, तर अशी कारवाई American Delta Force शिवाय शक्य नसल्याचे मानले जाते.
American Delta Force इतकी गुप्त का?
अमेरिकन सरकारने अधिकृतपणे Delta Force चे अस्तित्व मान्य केलेले नाही. या फोर्समधील सैनिकांची नावे, चेहरे आणि मोहिमांची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. कोणतीही प्रेस कॉन्फरन्स किंवा शौर्यपदकांची अधिकृत घोषणा केली जात नाही. “काम झालं की गायब” हाच या फोर्सचा अलिखित नियम आहे. Delta Force ही केवळ एक सैनिकी तुकडी नसून, अमेरिकेचे सर्वात भयावह आणि प्रभावी गुप्त अस्त्र मानली जाते. मादुरो प्रकरणामुळे ही फोर्स पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली असली, तरी तिच्या अनेक कारवाया आजही गूढतेच्या पडद्याआड आहेत. जागतिक राजकारण, दहशतवाद आणि युद्धाच्या सावलीत American Delta Force शांतपणे, पण अत्यंत निर्दयपणे आपले काम करत असल्याचे चित्र दिसते.