अमेरिकेच्या BLA बंदीनंतर पाकिस्तानात भीषण हल्ला

अमेरिकेच्या BLA बंदीनंतर पाकिस्तानात भीषण हल्ला

9 जवान ठार, अनेक जखमी

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील वाशुक जिल्ह्यात मंगळवारी सशस्त्र बंडखोरांनी पोलिस ठाणे व निमलष्करी दलाच्या ठिकाणांवर भीषण हल्ला चढवला.

या हल्ल्यात किमान ९ पाकिस्तानी जवान ठार झाले असून, अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 40 ते 50 सशस्त्र दहशतवादी दुचाकींवरून आले आणि सरकारी इमारतींवर अंधाधुंद गोळीबार व ग्रेनेड हल्ले केले.

पाकिस्तानी सैनिक प्रत्युत्तर देण्यासाठी जात असतानाच बंडखोरांनी सापळा रचून हल्ला केल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला (BLA) अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या दिवशीच हा हल्ला झाला.

हल्ल्यानंतर बंडखोर घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू आहे.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नसली तरी पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, या मागे BLAचाच हात आहे.

बलुचिस्तानात हा संघटना अत्यंत सक्रिय असून, लष्कराविरोधात सतत हल्ले करत आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/nivadnukanapvi-thackeray-gat-hadarla-samantankan-motha-dawa/