Ambernath Crime News: अल्पवयीन मुलाचं अपहरण, आईकडून 12 लाखांची खंडणी मागणी

Crime

अंबरनाथ – बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या जलद कारवाईत, गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात यश मिळाले आहे. तब्बल 5 दिवसाच्या थरारानंतर पोलिसांनी गुजरात पोलिसांबरोबर समन्वय साधून तीन आरोपी अनिल खैर, नरेश खैर आणि लक्ष्मण खैर यांना ताब्यात घेतलं आहे.

प्रकरणाची संक्षिप्त माहिती:

1 सप्टेंबर रोजी डोंबिवलीतील एका महिलेचा अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेला आणि गायब झाला. अपहरण करणाऱ्यांनी आईकडे फोनवरून 12 लाख रुपयांची खंडणी मागणी केली. मुलीच्या आईने बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाईल सीडीआर तपासून आरोपींचा सुगावा शोधला आणि गुजरात पोलिसांशी संपर्क साधला.IMEI नंबरच्या साहाय्याने अल्पवयीन तरुणाचा शोध लावला आणि सुरक्षितपणे आईच्या ताब्यात परत आणला.

 आरोपींची माहिती:

अनिल खैर व नरेश खैर हे सख्खे भाऊ आहेत.
 लक्ष्मण खैर हे त्यांचे चुलत भाऊ आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी स्पष्ट केलं की, आरोपी व अपहरणीत मुलगा एकमेकांना परिचित आहेत.

बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि गुजरात पोलिसांच्या सहकार्यामुळे हा प्रकरण यशस्वीपणे उकलण्यात आला आहे. खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींना योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. जनतेत प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत करणारी ही घटना ठरली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/manoj-rane-shekado-worker/