दहिगाव, तेल्हारा:
दहिगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावात लावलेल्या पंचशील व निळ्या झेंड्यांची
काही जातीय प्रवृत्तीच्या लोकांनी विटंबना केली. याविरोधात आंबेडकरवादी
Related News
बारामुल्ला येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान,
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?
धारगड येथे वयोवृद्ध महिलेस प्राणघातक मारहाण;
हनीमूनसाठी युरोपला जाणार होते विनय आणि हिमांशी
श्रीनगरहून येण्यासाठी विमान तिकीटांचे दर तिप्पट;
धावत्या क्रूझरने घेतला पेट;
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळात शिवसेनेचे तीव्र आंदोलन
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या शोकभावना
आधी काडी केली अन् आता भीतीने पाकिस्तानी एअरफोर्स हाय अलर्टवर
पहलगाम दहशतवादी हल्ला : संशयितांचे स्केच जारी, संशयितांची कसून चौकशी
दुपारी लागलेल्या भीषण आगीत घर जळून खाक…
शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला
नागरिकांनी तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
मात्र, नंतर या तक्रारीचा राग धरून, संबंधित मंडळींवर राजकीय दबाव टाकून खोटे
गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर तेल्हारा पोलिसांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता गावात कोंबिंग
ऑपरेशन राबवले आणि गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे नोंदवले गेले.
या घटनेमुळे गावातील आंबेडकरवादी जनतेत भीतीचं वातावरण आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे आणि महिला आघाडी अध्यक्षा
आम्रपाली खंडारे यांनी गृहमंत्री व अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन पुढील मागण्या केल्या:
-
दहिगाव येथील आंबेडकरवादी नागरिकांवरील सर्व खोटे गुन्हे त्वरित रद्द करावेत.
-
तेल्हारा पोलीसांनी राबवलेलं कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावं.
-
खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांविरोधात चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे गजानन गवई, मनोहर बनसोड, किशोर जामनिक, अक्षय तायडे,
राजू मुंधवने, अमोल कलोरे, शंकरराव राजुस्कर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/patur-naib-tehsildarna-threatening-case/