अंबानीची मोठी सून श्लोका मेहताच्या बहिणीने केला कहरच

दिया मेहता

देशातील सर्वात मोठे उद्योगपती Mukesh Ambani यांची सून आणि Akash Ambani यांची पत्नी Shloka Ambani हिला सर्वजण ओळखतात. तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सबद्दलही सगळे अवेअर आहेत.

श्लोका प्रत्येक फंक्शनमध्ये तिच्या पारंपारिक लूकसह लाईमलाईट हिरावताना दिसून येते. पण तिची बहीण Diya Mehta तुम्ही ओळखता का? सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत दिया बॉलीवूडच्या सौंदर्यवतींपेक्षा कमी नाही. श्लोका एथनिक लुकने तर दिया मॉडर्न आउटफिटमध्ये आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करते.

फॅशनिस्टा आणि स्टायलिस्ट दिया मेहताच्या लूकची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. अलीकडेच, या सौंदर्यवतीने इंस्टाग्रामवर हटके कपडे परिधान करून एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोक स्केयर्ड फीलिंग वाल्या सुद्धा कमेंट करत आहेत.

आता तुम्ही विचार करत असाल की तिच्या आउटफिटमध्ये असे नक्की होते तरी काय, चला जाणून घेऊ. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम @dmjatia)

श्लोकाची बहीण दिया मेहता बहुतेक वेळा वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसते. ज्यामध्ये ती केवळ स्टायलिश दिसत नाही तर ग्लॅमरचा टच देखील एड करते.

या फोटोजमध्येही दियाचा ब्राऊन रंगाचा कॉटन कार्गो जंपसूट तिच्या हाईटला कॉम्पलीमेंट देताना दिसत आहे. या जंपसूटच्या उजव्या आणि डाव्या पायावर प्रत्येकी दोन पॉकेट्स डिझाइन केले आहेत.

विशेष बाब म्हणजे हेमलाइन समोरच्या बाजूला बेल्टप्रमाणे झाकलेली आहे. ऑनलाइन साइटवर या आउटफिटची किंमत अंदाजे 3 लाख 84 हजार रुपये आहे.

या कॉटन कार्गो जंपसूटची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्याचा बॅकलेस टॉप. यात कंबरेपासून कॉलरपर्यंत समोरच्या बाजूला एक झिप आहे आणि हॉल्टर नेकसह पूर्णपणे बॅकलेस डिझाइन केले आहे. त्यामुळे दिया मेहता या जंपसूटमध्ये बोल्ड स्टाइल दाखवताना दिसत आहे.

दिया मेहताच्या आउटफिटसोबतच तिचे ॲक्सेसरीजही लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दागिने मिनिमल ठेवून तिने फक्त एका हातात तिने ब्रेसलेट घातले होते. याशिवाय, दियाने गोल्डन हिल्स परिधान केले होते जे तिच्या ब्राऊन जंपसूटला मॅच करत होते, ज्यामध्ये लावलेले रेड रोज सर्वात जास्त हायलाइट होताना दिसले.