“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?

"अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?

१७ एप्रिल २०२५ | अंबाजोगाई (जि. बीड)

अंबाजोगाई येथील सनगाव गावात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

गावातीलच सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान हिला अमानुष मारहाण

Related News

केल्याची गंभीर घटना १४ एप्रिल रोजी समोर आली आहे.

पाठीवर पाईपने प्रचंड मारहाण करत तिची पाठ सोलून काढली असून,

तिला रक्त साकळेपर्यंत मारण्यात आले.

काय घडलं नेमकं?

ज्ञानेश्वरी अंजान यांना मायग्रेन व पाठीच्या दुखण्याचा त्रास असून,

सततच्या ध्वनिप्रदूषणामुळे त्यांचे आरोग्य ढासळले होते. २०२३ साली

गावातील मंदिरातील भोंग्याच्या आवाजाविरोधात तिने तक्रार केली होती.

सरपंच अनंत अंजान यांना विनंती करूनही आवाज कमी न झाल्याने तिने

अखेर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरच आवाज कमी झाला.

या प्रकरणानंतर, सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी तिच्या घरी जाऊन

धार्मिक कार्यक्रम करण्याचा दबाव टाकला. त्यानंतर तिच्या घराशेजारी जाणीवपूर्वक

तीन पिठाच्या गिरण्या सुरू करण्यात आल्या. सततच्या आवाजामुळे ज्ञानेश्वरी यांची

प्रकृती आणखी खालावली. शेवटी, १४ एप्रिल रोजी सरपंच आणि त्याच्या १० कार्यकर्त्यांनी

तिला शेतात रिंगण करून काठ्या व JCB पाईपने बेदम मारहाण केली.

राजकीय प्रतिक्रिया

या घटनेची माहिती समोर येताच समाजात आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना विचारले,

एका वकील महिलेला शेतात नेऊन मारहाण करणं, हा लोकशाहीतला काय न्याय आहे?

त्यांनी याबाबत सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

पोलिसांची भूमिका आणि गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी, ज्ञानेश्वरी अंजान यांना

एफआयआरची प्रत देण्यात आलेली नाही, असा आरोप आहे.

तसेच, तिच्यावर उपचार करून एका रात्रीतच घरी पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मी आज जिवंत आहे, ते फक्त पोलिसांमुळे, नाहीतर मला ते मारून टाकले असते,” असे तीने स्वतः म्हटले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/my-mamta-jhali-kali/

Related News