अमरावतीत भूकंपसदृश हलके धक्के ; शिवणगाव-फत्तेपूर परिसरात ग्रामस्थ भयभीत

अमरावतीत

अमरावती: जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव-फत्तेपूर परिसरात रविवारी (दि. २४) रात्री सुमारे ११.३० ते ११.४५ दरम्यान सलग भूकंपसदृश हलके धक्के जाणवले. ही धक्के इतकी सौम्य होती की भूमापक यंत्रावर नोंद झाली नाही, तरी काही घरांतील भांडी पडल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार मयुर कळसे, प्रशासकीय यंत्रणा आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मध्यरात्री गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सोमवारी सकाळी आमदार राजेश वानखडे आणि खासदार बळवंत वानखडे यांनीही गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि तातडीने तपास यंत्रणा कार्यरत करण्याचे निर्देश दिले.

याबाबत अधिक शास्त्रीय मार्गदर्शनासाठी २६ नोव्हेंबर रोजी विशेष सभा आयोजित केली जाणार असून, संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल-अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर गावात येऊन नागरिकांशी चर्चा करणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी सांगितले.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/strong-comment-on-anjali-damanias-storm-anger-dhananjay-munde-and-nationalist-leaders-7-important-issues-exposed-question/

Related News