राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडले

पाणलोट क्षेत्रात

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरण

गेल्या आठवड्यात भरले आहे. या धरणाचे सर्व सात दरवाजे उघडण्यात आले.

केवळ एका तासात दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रात ११,५०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

Related News

येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने

पंचगंगा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राधानगरी तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला

या पावसामुळे धरण काठोकाठ भरले गेले. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात रात्री पावसाचा जोर वाढला.

आज बुधवारी एका तासांमध्ये सातही स्वयंचलित दरवाजे उघडले.

धरणातून अकरा हजार पाचशे क्यूसेक्सने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने

भोगावती नदीपात्र पूरस्थितीतून वाहत आहे. यावर्षी पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे

सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदीकाठच्या गावांना

जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी होता.

धरणाचा विजगृह, सांडवा आणि दोन स्वयंचलित दरवाज्यामधून संथगतीने

४३५६ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला

पावसाचा जोर इतका भयानक होता की, पहाटे पावणे पाच ते पावणे सहाच्या दरम्यान

धरणाचे सर्व दरवाजे उघडले गेले. पहाटे चार वाजुन पन्नास मिनिटांनी

पाचव्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. त्यानंतर केवळ तीन मिनिटांच्या अंतराने

तिसरा दरवाजा पाच वाजून सोळा मिनिटांनी चौथा,

पहिला दरवाजा पाच वाजून तेहतीस मिनिटांनी, पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी दुसऱ्या क्रमांकाचा दरवाजा उघडला.

Read also: https://ajinkyabharat.com/nitin-gadkaris-letter-to-nirmala-sitharaman/

Related News