अकोला: अकोल्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर धक्कादायक प्रकार घडला आहे. डाबकी रोड पोलिसांनी आरोपी तौहिद समीर बैद्य याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.
माहितीनुसार, आरोपीने चाकूचा धाक दाखवत मुलीवर अत्याचार केला. घटना शनिवार दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान घडली. त्या वेळी मुलगी घरात एकटी होती, कारण नातेवाईक गणपती पाहण्यासाठी गेले होते.
घटनेनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले असून त्याचा शोध सुरु आहे. माहितीप्रमाणे, आरोपी यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे.
सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
read also :https://ajinkyabharat.com/shri-shivaji-college-akot-yehe-teacher-day/