अली गोणीने दिलं स्पष्ट उत्तर!

अली गोणीचा मोठा खुलासा : ‘गणपती बाप्पा मोरया’ का नाही म्हटलं? कारण ऐकून थक्क व्हाल!

मुंबई – अभिनेता अली गोणीच्या गणेशोत्सवाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अली गोणीच्या गर्लफ्रेंड जास्मिन भसीन आणि मैत्रीण निया शर्मा आनंदाने ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करताना दिसल्या, परंतु अली गोणीने या जयघोषात सहभागी होण्याचे टाळले. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती. आता अलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

फिल्मीज्ञानशी बोलताना अली गोणीने स्पष्ट केले, “मी काहीतरी विचार करत होतो, कुठे होतो, याबाबत इतका वाद निर्माण होईल हे मला कल्पनासुद्धा नव्हते. सोशल मीडियावर काही लोकांनी माझ्या गर्लफ्रेंड जास्मिन आणि आईला शिव्या दिल्या. जर मला कोणत्याही धर्माचा अपमान करायचा असता, तर मी इतका विचारपूर्वक या कार्यक्रमात का जातो?”

अलीने पुढे सांगितले, “मी आधी कधीही गणेश पूजेसाठी गेलो नव्हतो. कारण माझ्या धर्मानुसार पूजा करण्याची परवानगी नाही. पण कुराणात स्पष्ट लिहिलेले आहे की प्रत्येक धर्माचा आदर करणे आवश्यक आहे आणि मी तेच करतो.”

अली गोणीने सांगितले की, “मी तंद्रीत होतो, त्यामुळे गणपती बाप्पा मोरया न म्हणण्यामागे कोणताही अपमान नव्हता. मी देवाचे नाव न घेतल्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला, हे खूप दुर्दैवी आहे. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो.”

अली गोणी आणि जास्मिन भसीन ही जोडी ‘बिग बॉस’मुळे लोकप्रिय झाली असून, दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या संबंधाची चर्चा वारंवार होत असते.

नागरिकांनीही अली गोणीच्या भूमिकेचे कौतुक करत सर्व धर्मांचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सामाजिक माध्यमांवर देखील यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या असून, शांतता आणि समन्वयाचे संदेश वाढले आहेत.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/karanja-municipal-receive-environmental-artificial-talav-scheme/