आलेगाव दूषित पाण्याच्या प्रश्नाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल; महिलांचा हंडा मोर्चा आंदोलन

“प्रश्न सुटले नाहीत तर सरपंच-सचिवांच्या घरावर मोर्चा”

अकोला : आलेगाव व गोळेगाव परिसरातील दूषित पाणी, सांडपाणी व खराब रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

या प्रश्नांवर तोडगा काढावा, या मागणीसाठी शेकडो महिलांनी अलीकडेच हंडा मोर्चा काढून आलेगाव ग्रामपंचायतीवर जोरदार घोषणाबाजी केली होती.

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तातडीने याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई

करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, प्रभारी गटविकास अधिकारी यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

गोळेगाव येथील शासकीय विहिरीत पुराचे पाणी साचल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे.

त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. महिलांसह विद्यार्थी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते. प्रभारी

गटविकास अधिकारी गावात आल्यानंतर महिलांनी पुन्हा हंडा मोर्चा आणत संताप व्यक्त केला.

यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या हलगर्जी कारभारावर संताप व्यक्त केला. प्रश्न न सुटल्यास सरपंच व सचिवांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा

नागरिकांनी दिला. अखेर अधिकाऱ्यांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या.

Read also :https://ajinkyabharat.com/poor-party-justice/