विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधी
शहरातील नामांकित गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा बिल्डर मुन्ना उर्फ शशिकांत बजरंगलाल अग्रवाल याच्यासह दोन अज्ञात इसमावर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विनयभंग, जीवे मारण्याचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये बी एन एस 2023 ११५ (२),३५२,३(५),३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) प्रमाणे शेगाव पोलिसांनी नोंद करून आरोपी मुन्ना अग्रवाल सह इतर अज्ञात दोघांचा शोध सुरू केला आहे. मुन्ना अग्रवाल हा शहरातून फरार झाला असून मुन्ना अग्रवाल याला बुलढाणा पोलीस रात्रंदिवस शोधत आहेत.घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/3-fierce-halle-purvat-pune-district-destructive-reality-about-bibtyacha/
