अकोट : राष्ट्रीय एकात्मता नवदुर्गा नवरात्र महोत्सव मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी, सायं. ७ वाजता संत नरसिंग महाराज मंदिर सभागृह, अकोट येथे पार पडणार आहे.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे राष्ट्रीय विषयांवर स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडणारे, समाजातील घडामोडी व आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करणारे अभ्यासू वक्ते म्हणून देशभर परिचित आहेत. त्यांच्या भाषणशैलीतून इतिहास, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक प्रश्न, संस्कृती आणि देशभक्तीचे विचार प्रभावीपणे मांडले जातात. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाची अकोटकरांना उत्कंठा लागली आहे.
आयोजक मंडळाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या व्याख्यानाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा.
कार्यक्रमाचे ठिकाण : संत नरसिंग महाराज मंदिर सभागृह, अकोट
दिनांक – २३ सप्टेंबर २०२५
read also :https://ajinkyabharat.com/parsod-gavache-maji-sarpanch/
