अकोट: अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ऍड. किरण सरनाईक यांच्या स्थानिक
विकास निधी अंतर्गत श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय, अकोट येथे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला.
२५ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील ५० शाळांना ३८० ग्रीन बोर्डचे वाटप करण्यात आले.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ऍड. महेशभाऊ गणगणे,
छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शिरीष पोटे, सचिव डॉ. मेघना पोटे,
प्राचार्य पी. बी. रावणकर, तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
शिक्षकांसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आमदार सरनाईक यांचे आश्वासन
शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी आपल्या भाषणात शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी
शासन दरबारी लढा देण्याची ग्वाही दिली. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष ऍड. महेश गणगणे यांनी सध्याच्या
शिक्षण व्यवस्थेवरील संकटावर भाष्य करत, शिक्षकांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.
शाळांसाठी अधिक सुविधा मिळण्याची गरज
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिरीष पोटे यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे शाळांसमोर नवीन आव्हाने निर्माण होत असल्याचे सांगून,
शासनाने अधिक भौतिक व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिक्षक आमदारांकडे केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. बी. रावणकर यांनी शालेय अनुदानातील कपात टप्प्याटप्प्याने करण्याची मागणी केली.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षकांचा सहभाग
शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात तालुक्यातील अनेक शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक पी. एम. गावंडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. के. सी. गौर यांनी केले.
शाहू परिवारातील शिक्षक व शिक्षिकांनी अथक परिश्रम घेत हा शैक्षणिक व वैचारिक कार्यक्रम यशस्वी केला.