अकोट – “मदत नव्हे कर्तव्य” हे ब्रिदवाक्य जपणाऱ्या भूमी फाउंडेशनतर्फे नरसिंग महाराज मंदिर सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
अकोटच्या इतिहासात ठसा उमटवणाऱ्या या कार्यक्रमात ६० ते ७० मुलांनी नृत्य, गायन, संगीतासह विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
विशेष म्हणजे पालकांनीही डान्स व गायनात सहभागी होऊन कार्यक्रम रंगतदार केला.
या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री रणजित पाटील, नरेशजी भुतडा, डॉ. रहेमान खान, डॉ. विशाल इंगोले, डॉ. योगेश गुप्ता, संतोष झुणझुनवाला
यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. शेकडो प्रेक्षकांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
स्पर्धेतील विजेते :
अ गट सोलो – प्रथम : मानसी खाडे, द्वितीय : रिदम जैस्वाल, तृतीय : आर्या ठेलकर व युग हातेकर
ब गट सोलो – प्रथम : परीक्षित, द्वितीय : जानवी पाटील, तृतीय : फारूक शेख व प्राची धांडे
गट स्पर्धा – प्रथम : शिवकन्या गट, द्वितीय : राजस्थानी गट, तृतीय : प्रेरणा गट व राजलक्ष्मी गट
कार्यक्रमाचे संचालन प्रविणकुमार पुडगे, प्रकाश गायकी व अमोल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन भूमी फाउंडेशनच्या अध्यक्षा कु. चंचल पितांबरवाले यांनी मानले.
या उपक्रमामुळे अकोटमधील बालगोपालांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/musadhar-pausamue-chikhali-talukyatil-shala-college-closed-both-days/