अकोट, प्रतिनिधी
अकोट नगरपालिकेच्या कर निर्धारणात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करत टॅक्स नोटीसेसची होळी करण्यात आली.
नगरपालिकेने भाजपाच्या कार्यकाळात शहरातील मालमत्तांवर भरमसाठ कर आकारणी केली होती.
या कर निर्धारणाच्या नोटीसेस लपवून ठेवण्यात आल्या, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेकडून यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले होते, त्यानंतर केवळ वर्तमानपत्रांत नोटीस प्रकाशित करण्यात आली,
मात्र मालमत्ता धारकांना वैयक्तिक नोटीसेस वितरित करण्यात आल्या नाहीत.
नवीन कर निर्धारणाच्या नोटीसेस मिळाल्यानंतर करात मोठी वाढ झाल्याचे समोर आले, त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजीचा सुर उमटला आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने नोटीसेसची होळी करून तीव्र आंदोलन करण्यात आले.
या वेळी शिवसेनेने करवाढ त्वरित मागे घ्यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
तसेच पालिकेने जर ही करवाढ मागे घेतली नाही तर शहरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, शहरप्रमुख ॲड. मनोज खंडारे, अमोल पालेकर,
डॉ. गजानन महल्ले, शहर संघटक सुनील रंदे, विजय ढेपे, बंडू बोरोकर, संजय भट्टी, प्रथेमेश बोरोडे,
तसेच प्रा. अनंता सपकाळ, गजानन कांगळे, रोहित बरेठिया, कार्तिक सुरत्ने,
आदित्य लाहोरे, अनिकेत सुरत्ने आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या या आंदोलनामुळे शहरात कर वाढीच्या मुद्द्यावर नव्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.