अकोट- शहरात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांच्या वतीने ‘मस्जिद परिचय’ हा उपक्रम शौकत अली चौक जामा मस्जिद येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात अजान, नमाज यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांना प्राधान्य देत सर्व समाज बांधवांचे गैरसमज
दूर करण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.या वेळी अकोट शहराचे नाव उज्ज्वल करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणारे अधिकारी
म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष महल्ले आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिंम्मत दंदी यांना ‘अकोट भूषण पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
संतोष महल्ले यांनी अकोट शहरात आदर्श अधिकारी म्हणून काम करताना सर्वधर्मसमभाव आणि शांततेचा संदेश प्रत्यक्षात आणला. तर हिंम्मत दंदी यांनी कायदा व सुव्यवस्था
अबाधित ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिले असून, आजवर १३ हून अधिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. “असा अधिकारी पुन्हा होणे नाही” अशा भावना या कार्यक्रमात सर्व
समाजबांधवांच्या मनातून व्यक्त झाल्या.याशिवाय समाजहितासाठी योगदान देणारे सत्यपाल महाराज यांचाही सन्मान करण्यात आला.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लातूर येथील इस्माईल कासमी यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सय्यद रफिक पारनेरकर आणि प्रमुख अतिथी म्हणून मौलवी
बरकत उल्ला उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमान उल्ला रवान यांनी केले तर आभार प्रदर्शन वसीम अहमद खान यांनी मानले. या आदर्श उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/rastyavar-rakne-bhijleli-woman-akhher-khawale-yanchaya-madati-mile-jeevan-daan/