अकोट (प्रतिनिधी):
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील मच्छी बाजारात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण
आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे ६ ते ७ दुकाने जळून खाक झाली
Related News
असून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
स्थानिकांनी घेतला आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न
रात्री उशिरा आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पाण्याच्या
हौद व टाक्यांद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने स्थानिकांचे प्रयत्न अपुरे ठरले.
अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण
आग वाढत असल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दुकानदारांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
नुकसानीचा पंचनामा लवकरच
आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्युत शॉर्टसर्किट ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करून व्यापाऱ्यांना शक्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
