अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान

उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान

अकोट | प्रतिनिधी

अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन

पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश

Related News

ठाकरे व विभागीय अध्यक्ष राजेश जावरकर (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाचे ठळक:

  • उद्घाटक म्हणून सुनील बोरोडे आणि कैलास अकर्ते यांची उपस्थिती

  • प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश चिखले, सागर बोरोडे, मनोज झाडे यांचे मार्गदर्शन

  • क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन:

प्रमुख पाहुणे मंगेश चिखले यांनी माळी महासंघ स्थापन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.

मनोज झाडे यांनी माळी उद्योजक शिबिराचे महत्व पटवून देत शेतीतून उद्योजकता कशी विकसित होऊ शकते, यावर भर दिला.

रवींद्र पोटदुखे यांनी विद्यार्थ्यांना नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळण्याचे महत्त्व समजावले.

नवीन पदाधिकाऱ्यांचा गौरव:

कार्यक्रमात नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र व फुलपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पदाधिकारी यामध्ये –

  • शाखाप्रमुख: तानाजी शेगोकार

  • उपप्रमुख: प्रज्वल जावरकर

  • सचिव: ऋषिकेश बाळे

  • सहसचिव: गोपाल अकर्ते

  • कोषाध्यक्ष: चेतन वायकर

  • सहकोषाध्यक्ष: निलेश कातखेडे

  • संघटक: सुहास पवार

  • सहसंघटक: रोशन अकर्ते

  • प्रसिद्धीप्रमुख: अनुप्रित कातखेडे

  • तसेच अनेक शाखा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन आणि स्वागत:

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल खासबागे यांनी, संचालन पवन बेलसरे, तर आभार प्रदर्शन कमलेश यावले यांनी केले.

अश्विन महाराज बोरोडे (ऋत्विक) यांचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

समाज बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती:

या कार्यक्रमास माळी समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल निमकर, अजय काळे, अतुल लोखंडे, भूषण गणगणे यांचे मोलाचे योगदान राहिले.

Related News