अकोट तालुक्यात पांदन रस्त्यांची दुरावस्था

अकोट तालुक्यात पांदन रस्त्यांची दुरावस्था

विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधी

अकोट : अकोट तालुक्यातील पांदन रस्ते मोकळे करण्यासाठी शासनाच्या वतीने उपाय योजना केल्या जात आहेत.

सध्या स्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस असल्याने व शेतकऱ्यांच्या पेरणीची व मशागतीची लगबग असल्याने तालुक्यातील

पांदन रस्ते स्थानिक प्रशासनाने मोकळे करून देणे गरजेचे असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीकरीता व मशागति करीता

कुठलीही अडचण जाणार नाही म्हणून स्थानिक प्रशासनाच्या वतीने पांदन रस्ते मोकळे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मात्र अकोट तालुक्यातील सावरा परिसरामध्ये पांदन रस्त्याची अतिशय बिकट दुरावस्था पहावयास मिळाली आहे.

शेतीच्या पेरणी करिता व मशागती करिता जाणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत.

सावरा परिसरातील पांदन रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय

टाळावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

Read Also :https://ajinkyabharat.com/lalpari-and-motorcycle/