अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, पिकांचे अतोनात नुकसान – शेतकऱ्यांची तातडीने मदत मागणी

अकोट: तालुक्यातील सर्व महसूल मंडळात सुमारे

सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी संततधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचले असून काही पिके पाण्याखाली गेली आहेत,

तर काही पिके अक्षरशः दिसेनासे झाली आहेत.

वारंवार येणारा पाऊस आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

हुमणी, अळी, बाँड अळी या सारख्या संकटांनी आधीच शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही,

त्यात निसर्ग कोपल्याने बळीराजाच्या पुढील उत्पन्नावर मोठा प्रश्न निर्माण केला आहे.

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील काही

लहान-मोठ्या नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून,

त्यांनी तातडीने प्रशासनाकडे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

तालुक्यातील 8 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाचे पंचनामा अद्याप पूर्ण झालेले नाही.

शेतकऱ्यांच्या मते, पंचनाम्यात फक्त 5 ते 10 गुंठे नुकसान दाखवले गेले असून

नदीकाठीच्या शेतांचे नुकसान न दाखवल्याचेही आरोप आहेत.

प्रतिक्रिया

प्रसाद कुलट, युवा शेतकरी, पुंडा:
“थातूरमातूर पंचनाम्याने आम्हाला न्याय मिळणार नाही.

खरी मदत हवी, नाहीतर हा पाऊस फक्त शेतं नाही तर आमची स्वप्नंही गिळंकृत करेल.

नदीकाठी नसलेल्या जमिनीचे नुकसान का दाखवले जात नाही?”

कुलदीप वसु, जिल्हा अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष:
“शासनाने त्वरित कोणतेही पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी.

संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.”

विशेष लक्षवेधी

पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडले; आंबोडा-अकोलखेड परिसरात पाणी शिरले

6.30 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बुधवारी (दि. 27 ऑगस्ट 2025) दुपारी दोन दरवाजे पाच सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आले.

प्रशासनाने नागरिकांना नदी पात्र ओलांडू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

read also:https://ajinkyabharat.com/shetkari-rajchaya-grand-balgadyanchi-miravanuk/