अकोट
तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील सदन कास्तकार नुकतेच केळी उत्पादक संघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने सन 2024-25 च्या
राज्यस्तरीय केळी रत्न कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित सोलापूर माढा येथे करण्यात आला आज सोपान रावणकार
त्यांच्या शेतातील केळी परदेशात इराण येथे निर्यात करण्यात आली.त्यावेळी स्वप्निल रावणकार यांच्या शेतात
कृषी विभागाचे अधिकारी व गावातील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.उपविभागीय कृषी अधिकारी
तुषार ढगारे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आपल्या गावातील केळी परदेशात निर्यात होणे ही
आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब असून इतर आणखी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या देशात जण्या साठी
आणखी प्रयत्न करन्यास शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा
अवलंब करून निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. त्यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले
जाईल असे पण त्यांनी सांगितले तसेच तालुका कृषी अधिकारी आश्विनी बिराजदार यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
की आपल्या शेती मालाला बाजारपेठ उंच प्रतीचा दर्जा मिळावा आज आपल्या तालुक्यातील एका शेतकऱ्याचा माल गेला
आणखी काही शेतकऱ्यांनी वेग वेगळ्या देशात माल जाण्या साठी अथाग प्रयत्न करावे असे आवाहन यांनी केले
या कार्यक्रमाला सहाय्यक कृषी अधिकारी गजानन शिंगणे सहाय्यक कृषी अधिकारी संकेत पाटील
संकेत पाचपोर गजानन रावणकर मोहन रावणकर केशव रावणकार
पत्रकार शरद भेंडे प्रतीक चिकटे अजय शेंडे विनोद तेलगोटे अक्षय रावणकर रोशन मानकर व तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/malegaon-bomb-set-khatla-accused-innocent-suit/