अकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या

अकोट तालुक्यात पिकांचे नुकसान, प्रहार कार्यकर्त्यांकडून तहसीलदारांना निवेदन

अकोट :अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

काही भागात शेतात पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन,

संत्रा आदी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अकोट तहसीलदार

यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या

खात्यात मदत जमा करण्याची मागणी केली.

यामध्ये कोणताही शेतकरी वगळला जाणार नाही याची दक्षता घेण्याचीही मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीसाठी नोंदणी केली असता  “सक्सेस” दाखवत असले तरी

सातबाऱ्यावर त्याचा उल्लेख दिसत नाही,

अशा तांत्रिक अडचणींबद्दलही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्व्हर सतत डाऊन राहत असल्याने शेतकऱ्यांना तासन्तास शेतात बसूनही

नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत.

या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जीवन खवले,

श्रीजीत कराळे, शुभम नारे, कुलदीप वसु, सुशील फुंडकर

यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also : https://ajinkyabharat.com/representative-sarkarcha-gr/