अकोट तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न

अकोट तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न

अकोट तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा सेंट पॉल्स अकॅडमी येथे उत्साहात संपन्न

अकोट – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला आणि अकोट तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने

अकोट तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथे करण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन सेंट पॉल्स अकॅडमीचे सचिव मा. प्रमोद चांडक यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोट तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष प्राचार्य संजय वालसिंगे, सेंट पॉल्स अकॅडमीचे प्राचार्य विजय बिहाडे,

अकोट तालुका क्रीडा संयोजक शरद हिंगणकर व अकोट तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे सचिव निलेश झाडे उपस्थित होते.

यावेळी वॉरिअर्स अकॅडमी, अकोटचे संचालक अनुप चांदणे यांच्या तर्फे तालुक्यातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरलेल्या खेळाडूंचा स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्य खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला.

पंच म्हणून सौम्य लोडया, नीरज वांडे, ओम गोठकडे, ओम राऊत, शोषित गुलवाडे, प्रतीक वांडे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

कार्यक्रमाचे संचालन सतीश ठोकळ, प्रस्ताविक निलेश झाडे तर आभार प्रदर्शन क्रीडा संयोजक शरद हिंगणकर यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनुप चांदणे, अभिलाष काळमेघ, सुधीर रेलकर, प्रशांत ठोकळ, सुयोग कल्पेकर, प्रणव देंडव, विक्रांत चंदनशिव, विकी किल्लेदार, नारायण वानखडे, जिग्नेश चावला आदींनी परिश्रम घेतले.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/gaagavacha-navsala-pavanara-ganpati/