अकोट तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था

अकोट तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा गलथान कारभार,तालुक्याचा दवाखाना चालतोय झोपडी मधून

विशाल आग्रे,अकोट शहर प्रतिनिधी

अकोट : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय शहरात आहे.

मात्र या जनावरांच्या दवाखान्याची दयनीय व बिकट परिस्थिती निदर्शनास आली आहे.

तालुकास्तरावरील दवाखाना चालतोय एका झोपडी मधून,चिकित्सालयाला इमारत नसून टिनशेड व बांबूंनी उपभारलेल्या खोलीमधून कार्यालयाचे कामकाज केल्या जाते.

सध्या स्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस असून गेल्या आठ दिवसापासून सतत संततधार पाऊस

असल्याने उभारलेल्या दवाखान्याच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी व चिखल साचलेला आहे.

दवाखान्यातील मूळ दस्तऐवज, फाईली या सर्व परिस्थितीत दवाखाना कुठल्या व कुणाच्या भरोशावर चालतोय,

कार्यालयीन कागदपत्रे नेमकी कुठे ठेवली जातात? कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कुणाचा वचक आहे की नाही?

कार्यालय रामभरोसे तर नाही ना? शासनाच्या पैशांची उधळपट्टी केली तर जात नाही ना?

अशी अनेक प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून या अतिशय गंभीर बाबीकडे व गंभीर प्रकाराकडे का दुर्लक्ष केले जात आहे.

या पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था तात्काळ सुधारून जनावरांची व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी.

व तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाची सुधारणा करून होणाऱ्या समस्यांचे निराकरण करावे.

अशी मागणी अकोट शहरातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/kurnakhed-yethil-soldier-nitesh-ghat-martyred/