अकोट तालुक्यात अवैध गोवंश वाहतुकीवर अकोट ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत २० गोवंश जातीची जनावरे जप्त केली.
ग्राम धारूळ शिवारातून मोहाळा येथे कत्तलीसाठी गोवंश जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या आदेशानुसार सुकळी-मोहाळा रस्त्यावर गणोरकर यांच्या शेताजवळ दोन संशयित इसमांना अडवण्यात आले.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासानंतर सदर जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी २० गोवंश जातीची जनावरे जप्त करून त्यांची किंमत सुमारे २.८१ लाख रुपये असल्याचे सांगितले.
जप्त जनावरे संगोपनासाठी अकोट गौरक्षण सेवा समितीला सुपूर्द करण्यात आली.
या प्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे,
पोलीस उपनिरीक्षक शिवानंद विर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chillar-kurtkar-solapurkar-konachaya-blessing-rautancha-chakar-aani-bhaiyyajinchi-litmus-test/