अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिखलदरा येथे संपन्न झाला.
Related News
समारोहास डिस्टिक्ट से.क्रे.रोटे डॉ.जुगल चिराणीया,असि.गेव्ह रोटे.सुनिल धोंडके,रोटरी चॅरिटेबल
ट्रस्ट चे अध्यक्ष रोटे.प्रभाकरराव मानकर,आय.पी.पी.रोटे.श्याम पिंपळे,मा.सचिव रोटे.श्याम शर्मा,डिस्टिक्ट जाॅईंट सेक्रे.रोटे.गुणवंत देशपांडे,
डिस्टिक्ट काॅन्फरन्स सेक्रे.रोटे अतुल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्ष २०२५-२०२६ चे अध्यक्ष म्हणुन अकोट शहरातील नामवंत
इंजि.रोटे.रवि पवार यांची अध्यक्षपदी तर रोटे.डाॅ.नवेश मोहता यांची सचिव पदाकरीता शपथविधी मोठ्या थाटामाटात पार पडला.
रोटे.डाॅ.चिराणीया यांनी अकोट रोटरी क्लब च्या कार्याची प्रशंसा करिता भविष्यात वैद्यकीय सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
असि.गव्ह रोटे.सुनिल घोडके यांनी डिस्टिक्ट गव्हर्नर रोटे.ज्ञानेश्वर शेवाळे यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.
रोपे.प्रभाकरराव मानकर यांनी रोटरी क्लब ऑफ अकोट च्या कार्याची स्तुती करीत भविष्यात अधिक सक्षम युवा
नेतृत्व तयार व्हावेत यासाठी आवाहन केले व नुतन अध्यक्ष व सचिव यांना शुभेच्छा दिल्या.
मावळते अध्यक्ष रोटे.श्याम पिंपळे इंजि.रोटे.रवि पवार यांना अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला गॅवेल व पिन देवुन सोपवला.
तर रोटे.श्याम शर्मा यांनी सचिव पदाचा पदभार रोटे.डाॅ.नवेश मोहता यांना हस्तांतरित केला.
नुतन अध्यक्ष इंजि.रवि पवार यांनी समारोह प्रसंगी येत्या वर्षात उत्तम लोकापयोगी प्रकल्प राबवुण रोटरी क्लबच नाव लौकीक व उंचावण्याची ग्वाही दिली.
व त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व सर्व रोटरी सदस्यांना भेट वस्तु व स्मृतिचिन्ह दिले.
रोटे.ऍड राजकुमार गांधी यांनी अकोट रोटरी क्लब च्या १९७१ सालच्या स्थापना वर्षांची दुर्मिळ फोटोंना अकोट रोटरी क्लबला भेट म्हणुन दिल्यात.
सदर समारोहाचे संचलन रोटे.शिरीष पोटे यांनी केले.समारोहास रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष रोटे.सुरेशभाई सेदाणी,रोटे.रवि मुंडगावकर,
रोटे.चंद्रकांत अग्रवाल,रोटे.प्रमोद लहाने,रोटे.सुरेश व्यवहारे,रोटे.उद्धव गणगणे,रोटे.संतोष इस्तापे,रोटे.दिपक कतोरे,
रोटे.डॉ.विशाल इंगोले,रोटे.विजय सेदाणी,रोटे.कमल अग्रवाल,रोटे.हिमांशु अग्रवाल,असे प्रसिद्धीप्रमुख रोटे.डाॅ.विशाल इंगोले यांनी कळविले.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-praharchi-muthi-action-akolid-akolid-jugar-adyavar-dhad/
