आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोट पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक
अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची उपस्थिती
अकोट – आगामी कावड यात्रा, गणेशोत्सव, ईद-मिलाद आदी सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी अकोट शहर पोलिस ठाण्याच्या सावली सभागृहात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
बैठकीस अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बैठकीत सणांचे नियोजन, मिरवणुकीतील शिस्त, वाहतूक व्यवस्था व बंदोबस्त यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक चांडक यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ
पोलिसांना कळवावी, तसेच सण-उत्सव आनंदात आणि शांततेत साजरे करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
सर्व मंडळे व समित्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. बैठकीस अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक निखील पाटील,
अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, अकोट शहर पोलिस ठाणेदार अमोल माळवे, अकोट ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे,
नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेबरे, विविध शासकीय विभाग प्रमुख, कावड समिती व मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, मान्यवर नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन ठाणेदार अमोल माळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ठाणेदार किशोर जुनघरे यांनी मानले.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/bharat-itka-maels-kalpana-nasel-basit-ali/