अकोट ओबीसी संघर्ष समितीचा उपविभागीय अधिकारी यांना आंदोलनाचा इशारा

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे

अकोट ओबीसी संघर्ष समितीचा उपविभागीय अधिकारी यांना आंदोलनाचा इशारा

अकोट : ओबीसी संघर्ष समिती अकोटच्यावतीने 16 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यामध्ये मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे व महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट द्वारे काढलेला जीआर ( शासन निर्णय) ताबडतोब रद्द करण्यात यावा, त्याचप्रमाणे ओबीसीची जातीय जनगणना तात्काळ सुरू करावी. या प्रमुख मागण्यांकरिता निवेदन देण्यात आले.शासनाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यास ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी सौ संध्या हरिभाऊ वाघोडे मा. जि प अध्यक्ष अकोला, प्रदीप वानखडे माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, डॉ. गजानन महल्ले, मंगेश चिखले, सौ सुनंदा साबळे,काशीराम साबळे, मनोज खंडारे यांचेसह ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/upajilha-ingredient-syed-akil-yancha-gat-development-officer-yana-request/