अकोट नगरपालिकेत वाढीव कराविरोधात जनतेचा संताप; 17 हजारांहून अधिक हरकती दाखल
अकोट – अकोट नगरपालिकेने शहरातील मालमत्ता धारक आणि घरगुती नागरिकांवर अवाढव्य कर आकारणी केल्याने शहरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढीव कराविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी जोरदार निषेध नोंदवला.
नगरपालिकेकडून हरकती नोंदविण्यासाठी ६ ऑगस्ट ही अंतिम तारीख ठरविण्यात आली होती. या मुदतीपूर्वी कराविरोधात नगरपालिकेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढीव कराविरोधात एकूण 17 हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत.
शहरवासीयांच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांना वाढीव कर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, सध्याची कर आकारणी अन्यायकारक असून, ती परवडणारी नाही.
त्यामुळे नगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन कर कमी करावा, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/jammu-and-kashmir-kishtwad-jilahyatil-chashoti-complex-fierce-dhagfuti/