अकोट – अकोट नगरपालिकेचे प्रशासक तसेच मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांची नागपूर येथील कोंढाळी येथे बदली करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून डॉ. बेंबरे यांच्या नेतृत्वाखाली अकोट नगरपालिकेचे विविध विकासकार्य सुरळीतपणे पार पडले आहे.शहरातील नागरिकांच्या सुविधा सुधारण्यासाठी, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा व इतर विकासात्मक योजना त्यांनी मनोयोगाने अंमलात आणल्या.डॉ. बेंबरे यांचा सहकार्यशील आणि मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते नागरिकांमध्ये विशेष प्रिय होते. अकोट नगरपालिकेच्या प्रशासनात त्यांनी वेळोवेळी येणाऱ्या अडचणीचे योग्य ते निराकरण केले. त्यांचे कार्यक्षेत्र अत्यंत पारदर्शक आणि कर्तव्यनिष्ठ राहिले आहे.शहरातील नागरिकांनी या बदलीबाबत दुःख व्यक्त करत पुढील काळातही अकोट नगरपालिकेला डॉ. बेंबरेसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अकोट नगरपालिकेच्या सततच्या विकासासाठी डॉ. बेंबरे यांनी मोलाचे योगदान दिले असून, त्यांचे योगदान स्मरणीय राहणार आहे. नागपूर येथील कोंढाळी येथे डॉ. बेंबरे यांची नवी जबाबदारी सुरु होणार आहे.अकोटच्या नागरिकांनी त्यांचे कार्य कौतुकपूर्वक स्मरण ठेवले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
read also :