अकोट फाईल मधील घरफोडीचा आरोपी जेरबंद

अकोट फाईल मधील घरफोडीचा आरोपी जेरबंद

५ लाखांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत

अवघ्या 24 तासात पोलिसांनी केली अटक

अकोला

शहरातील अकोट फाईल परिसरात घडलेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यात अकोट फाईल पोलीसांनी अवघ्या २४ तासांत उत्कृष्ट तपास करून आरोपीला ताब्यात घेत ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
२७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अभिनोददीन महमुदुल हसन रा. शादाब नगर, जिलानी मस्जिद जवळ, अकोट फाईल हे कुटुंबासह कामानिमित्त घराबाहेर गेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कम ६ लक्ष रुपये आणि १० ग्रॅम सोन्याचे बिस्किट असा एकूण ६ लक्ष ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
या प्रकरणी अकोट फाईल पोलीस विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हा घडताच पोलीस निरीक्षक शेख रहीम यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांमध्ये एएसआय अनिस पठाण, पो.ह. प्रशांत इंगळे, योगेश काटकर, संतोष चिंचोळकर, हर्षल श्रीवास, पो.का. ईमरान शाह, गिरीश तिडके, अमिर, ओम बैनवाड यांचा समावेश होता.परिसरातील हालचालींची चौकशी आणि माहिती संकलनाच्या आधारे तपास सुरू झाला. काही संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले आणि बौद्धिक चौकशीतून आरोपीची ओळख पटली
शादाब नगर अकोट फाईल येथील खिबर उर रहमान मोबिन उर रहमान (१९) याला संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ मोबाईल फोन, गुन्ह्यातील रोख रक्कम आणि सोनं असा एकूण ५ लक्ष २ हजार४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पीसीआर घेण्यात आला आहे.