अकोट कस्टडी डेथ प्रकरणातील पोलिस शिपायाचा जामीन अर्ज फेटाळला

अकोट कस्टडी डेथ प्रकरणातील पोलिस शिपायाचा जामीन अर्ज फेटाळला

अकोट शहर पोलीस ठाण्यात 2024 मध्ये घडलेल्या गोवर्धन हरमकार यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी अटक

करण्यात आलेल्या निलंबित पोलिस शिपाई रवि सदांशीव याचा जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी 1 ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने

आपण या प्रकरणात निरपराध असल्याचा दावा करत जामीन मागितला होता.

मात्र, सरकारी वकील अजित देशमुख यांनी मृतकाच्या शरीरावरील २५ जखमा, साक्षीदारांचे जबाब,

व पोलिस कर्मचारी असल्यामुळे दबाव टाकण्याची शक्यता यांचा आधार देत जामीन फेटाळावा, अशी मागणी केली होती.

सदर प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून, सर्व आरोपी 16 ऑक्टोबर 2024

पासून अकोला कारागृहात बंद आहेत. न्यायालयाने सर्व बाजू लक्षात घेऊन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pm-kisan-sanman-nidhic-20/