अकोल्यातील तलाठ्याची आत्महत्या; पत्नीवर गंभीर आरोप करत घेतला गळफास

अकोल्यातील तलाठ्याची आत्महत्या; पत्नीवर गंभीर आरोप करत घेतला गळफास

अकोला – अकोल्यातील तेल्हारा येथे कार्यरत असलेल्या तलाठ्याने गळफास घेऊन

आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिलानंद माणिकराव तेलगोटे

(रा. तेल्हारा) असे या तलाठ्याचे नाव असून, त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप करत

Related News

व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हा प्रकार थार एमआयडीसी परिसरात उघडकीस आला. तेलगोटे हे तेल्हारा तहसील

अंतर्गत हिवरखेड येथे तलाठी म्हणून कार्यरत होते.

अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि सर्वसामान्यांशी चांगले संबंध ठेवणारे कर्मचारी

असल्याने त्यांच्या अचानक आत्महत्येने शोककळा पसरली आहे.

दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून,

त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा आधार घेत चौकशी केली जात आहे.

Related News