अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात

अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात

अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज एक भीषण अपघात घडला आहे.

या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून,

अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related News

घटना बार्शीटाकळीतील नवीन बस स्थानकासमोर घडली.

महागाव येथून बार्शीटाकळी कडे येणाऱ्या दुचाकीस्वाराची स्विफ्ट डिझायर गाडीच्या उघडलेल्या

साईड दरवाजाला जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला.

दुर्दैव म्हणजे, याच वेळी समोरून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने या

जखमी व्यक्तीला चिरडलं. त्यामुळे रमेश ढोरे (रा. महागाव) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून,

पुढील तपास सुरु आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Also :
https://ajinkyabharat.com/12-minitant-ghetalam-ayushyacha-tokachan-decision-puisant-aayti-engineer-cctv-footage-sumor/

Related News