अकोल्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद ,

अकोला शहरात आजचा तापमानाचा पारा 45.5 अंशांवर पोहचला आहे. हे तापमान

या मोसमातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर अकोला

Related News

पाठोपाठ उर्वरित विदर्भातही अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे.

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग

बघायला मिळत आहेत. सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा प्रकोप पहायला मिळतोय.

तर काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणारा दुष्काळाने अनेक गावांची चिंता वाढवली आहे. मात्र, गेल्या

आठवड्यातील अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर (Akola)

सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झाले आहेत.

गेल्या पाच दिवसांत अकोल्याचं तापमान सातत्यानं 42 ते 45 अंशांदरम्यान फिरंतय. तर अकोला

शहराचा आजचा तापमानाचा पारा 45.5 अंशांवर पोहचला आहे. हे तापमान या मोसमातील सर्वाधिक

तापमान असल्याची नोंद आज करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम

अकोला शहरातील जनजीवनावर झाला आहे. तर पुढील काही दिवस उष्णतेची लाट अशीच

कायम राहील, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. 

अकोल्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे.

एकीकडे उष्णतेचा पारा तपात असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे.

अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असताना आता हवामान

विभागाकडून उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला येथे गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट असल्याचे बघायला मिळाले आहे.

तर पुढील 27 मे पर्यंत हीच परिस्थिती कायम असण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून

(IMD) देण्यात आला आहे. तर आज एकट्या अकोला शहराचे तापमान 45.5 अंश इतके नोंदवण्यात आले आहे.

हे तापमान या हंगामातील विक्रमी तापमान असल्याचे बोलले जात आहे. परिणामी,

संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

दुपारच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट 

अकोला पाठोपाठ उर्वरित विदर्भातही अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे.

नागपूरात देखील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे.

परिणामी, दुपारच्या वेळी रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून येत आहे.

म्हणूनच दुपारच्या वेळी शहरातील काही मुख्य सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

. नागपूर शहराचे आजचे तापमान हे 41.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.

तर गरज नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर जाणे शक्यतो टाळा,

अशा सूचनाही हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.

Read Also https://ajinkyabharat.com/akolekarani-anubhavali-shunya-savli-and-momentous-savli-naheshi-jhali/

Related News