अकोल्यात वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात मुस्लिम समाजाचे शांततापूर्ण आंदोलन

अकोल्यात वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात मुस्लिम समाजाचे शांततापूर्ण आंदोलन

अकोला, 28 मार्च: वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या

आवाहनावर मुस्लिम समाजाने आज अकोला शहरात शांततापूर्ण आंदोलन केले.

जुम्मेच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा निषेध करण्यात आला.

Related News

शहरातील प्रमुख मशिदींसह कच्छी मशीद येथेही मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले.

या वेळी कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया, साकिब मेमन, वाहिद मुसानी,

जावेद खान, तनवीर खान, कासम खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

विधेयकाविरोधातील भूमिका:

मुस्लिम समाजाच्या मते, वक्फ सुधार विधेयक 2025 हा एक कट असून, यामुळे मस्जिदी, ईदगाह,

मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि अन्य धर्मार्थ संस्थांवर गदा येऊ शकते.

विधेयक मंजूर झाल्यास, देशभरातील धार्मिक स्थळे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सरकारच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण होईल.

सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक

आणि सामाजिक हक्कांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करणे गरजेचे आहे.”

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील मुस्लिम समाजाला जुम्मेच्या नमाजवेळी काळी

पट्टी बांधून शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले आहे.

नमाजीनांनी सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली.

Related News