अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

प्रतिनिधी | आकोलखेड

आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमात गावातील गुणवंत

Related News

विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या युवकांचा व देशसेवेत कार्यरत जवानांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण निचळ होते तर का. ज. दाते सर, सतीश जोशी सर, मधुकरराव भोरखडे,

रामदास नाथे, शंकरराव रंधे सर, पत्रकार धन्नु बायवार, ढोरे साहेब, नागे साहेब,

ठोसरे साहेब व जगन्नाथ नीचळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठलांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि रोख ५०० रुपये देऊन गौरविण्यात आले.

सन्मानित विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

  • K.G.2: प्रियल पवार (प्रथम), पार्थवी लहाने (द्वितीय)

  • जि.प. मराठी वर्ग 4: नेहा महाजन (प्रथम), प्रणव डहाके (द्वितीय)

  • जि.प. उर्दू वर्ग 8: मिसबाह कौसर सलिम शहा (प्रथम), मो. आलफैज मो. सादिक (द्वितीय)

  • वर्ग 10: परिधी दिलीप रायबोले (प्रथम), धनश्री गोपाल ताडे (द्वितीय)

  • वर्ग 12: सुजाता विलास सावरकर (प्रथम), वैष्णवी नंदकिशोर गुप्ता (द्वितीय)

गावातील मान्यवरांचाही गौरव

देशसेवेत कार्यरत जवान तसेच विविध सरकारी व खाजगी क्षेत्रात नियुक्त युवक-युवतींचा विशेष सन्मान करण्यात आला.

तसेच पत्रकार धन्नु बायवारश्याम महाजन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणूक

आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीत दिंडी प्रमुखांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात का. ज. दाते, शंकरराव रंधे, सतीश जोशी, जगन्नाथ नीचळ आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण अरुण निचळ यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन

कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन माजी सरपंच केशव लांडे यांनी केले.

प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन विनय देशपांडे यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatil-135-varshanchi-kachhi-mashid-aaya-digital-ajan-theate-mobiler-ankta-yenar/

Related News