अकोला : असंघटित मजूर संघटना संयुक्त कृती समिती, अकोला यांच्या वतीने आज (१२ ऑगस्ट) जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ईमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या
नोंदणीकृत सदस्यांना मिळणाऱ्या विविध योजना टप्प्याटप्प्याने बंद केल्या जात असल्याचा आरोप संघटनेने केला.
मंडळाचा राखीव निधी ‘लाडकी बहिण’ योजनेत वळविल्यामुळे असंघटित मजुरांना दिल्या जाणाऱ्या
हक्काच्या योजना हळूहळू बंद होत आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने ही कृती थांबवून मजुरांच्या हितासाठी लागू केलेल्या शैक्षणिक व विकासात्मक योजना सातत्याने राबवाव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान मजुरांच्या अडचणींचा आढावा घेऊन शासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली.
Read also :https://ajinkyabharat.com/journalist-and-kalawant-hafiz-khan-yanche-death-complex-mourning/