अकोला – अकोल्यातील न्यू राधाकिसन प्लॉट येथील
श्री रिद्धि सिद्धि गणेश उत्सव मंडळाने
यंदा साकारलेला दहा अवतारांचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरतआहे.
श्री हरि विष्णूंनी पृथ्वी व जीवसृष्टीच्या रक्षणासाठी घेतलेले दहा प्रमुख अवतार
– मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम,
राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की – या देखाव्यात दर्शनास येत आहेत.
मंडळाने तयार केलेला हा देखावा पूर्णपणे
स्वयं-चालित असून भक्तांच्या मनाला भावणारा ठरत आहे.
दरवर्षी या मंडळाकडून रामायण, महाभारत आणि इतर
पुराणकथांवर आधारित देखावे सादर केले जातात.
मात्र यंदाचा दहा अवतारांचा देखावा धार्मिक आणि सांस्कृतिक संदेश
देत भाविकांना एका वेगळ्या आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घडवत आहे.
या देखाव्यामुळे गणेशोत्सवाचे आकर्षण अधिक वाढले
असून परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/tya-porine-sansar-ubha-banana-hota-bichari/