अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या माजी कार्याध्यक्षाला महिलेचा चोप

अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या माजी कार्याध्यक्षाला महिलेचा चोप

प्रतिनिधी | अकोला

अकोल्यातील मूर्तिजापूर येथे संभाजी ब्रिगेड (राजकीय) या संघटनेचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पारधी

यांना एका महिलेने सार्वजनिक ठिकाणी चपलांनी चोप दिल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

संबंधित महिलेने पारधी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक आरोप केले असून,

त्याच पार्श्वभूमीवर हा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेत महिलेने पारधी यांना चपलेने मारहाण केली,

तसेच सभोवतालच्या नागरिकांनीही हा प्रकार पाहिल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

या घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गजानन पारधी हे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे माजी कार्याध्यक्ष असल्याने प्रकरण अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

मात्र, स्थानिक पातळीवर या घटनेबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत नाराजी दर्शवली आहे.

काहींनी पारधी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे,

तर काहींनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची गरज व्यक्त केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/mundgaon-yehehe-deputy-chief-minister-ajit-pawar-yanchaya-vaddivasachaya-nirogya-shibir/