अकोल्यात उत्साहात साजरी झाली ईद; हजारो मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर नमाज अदा

अकोल्यात उत्साहात साजरी झाली ईद; हजारो मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर नमाज अदा

अकोला – मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानंतर आज अकोल्यात

ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली.

अकोल्यातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी

Related News

पारंपरिक वेशभूषेत ईदची विशेष नमाज अदा केली.

पहाटेपासूनच अकोल्यातील विविध मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

जुने शहरातील ऐतिहासिक ईदगाह येथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावत नमाज अदा केली.

मौलानांच्या मार्गदर्शनाखाली ईदची विशेष नमाज पार पडली,

त्यानंतर अरबी खुतबा पठण आणि सामूहिक दुआ करण्यात आली.

शहरात शांतता आणि धार्मिक सौहार्द कायम राखत ईदच्या निमित्ताने

मुस्लिम बांधवांचा उत्साह आणि भक्तिभाव विशेष लक्षवेधी ठरला.

Related News