अकोल्यात शेतकऱ्यांचे कपाशीचे पिक उपटले; अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार.

अकोल्यात शेतकऱ्यांचे कपाशीचे पिक उपटले; अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार.

२०१६ पासून सुरू असलेला कपाशी नाशाचा प्रकार पुन्हा एकदा समोर..!

अकोल्याच्या अकोट तालुक्यातील कुटासा येथील जऊखेड शिवारात अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांच्या

कपाशीचे पिक उपटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. किशोर सारंगधर भीवटे,

सुरेश डाबेराव, योगेशराव भीवटे, उमेशराव दौड, आणि अमोल नांदुरकर यांच्या शेतातील कपाशीचे पिक रातोरात नष्ट करण्यात आले.

या घटनेने शिवारात मोठी खळबळ उडाली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

या प्रकाराबाबत दहीहांडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्य असून २०१६ पासून शेतकरी त्रस्त आहेत.

वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अज्ञात आरोपीविरोधात कठोर

कारवाईची मागणी केली आहे.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणात गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bhatke-vimukta-and-major-fasavanu-karnaya-karanya-ilawadili-institution-officials/