अकोला (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील पातुर, बाळापूर तालुक्यांसह इतर
भागांमध्ये सतत घिरट्या घालणाऱ्या विमानामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
काही ठिकाणी या विमानाबाबत अफवाहीही पसरू लागल्या होत्या. मात्र आता या विमानाचा उद्देश स्पष्ट झाला आहे.
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील बी. एच. टेक या खाजगी कंपनीमार्फत राज्य शासनाच्या निर्देशानुसार
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी हे विमान उड्डाण करत होते.
पश्चिम विदर्भातील कोरडवाहू शेतजमिनीत जलसिंचनाचे नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प यंदाच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे.
राज्य सरकारने यासाठी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या सहा
जिल्ह्यांसाठी एकूण १७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचाच एक भाग म्हणून
बी. एच. टेक कंपनीकडून अकोल्यात विमानाद्वारे सर्वेक्षण सुरू आहे.
विमानाच्या घिरट्यांमुळे निर्माण झालेल्या अफवांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला असून,
हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी भविष्यकाळात अमूल्य ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-pre-mansoon-pavasacha-emphasis/