अकोल्यातही धरणे आंदोलन सुरू

अकोल्यातही धरणे आंदोलन सुरू

अकोला – आपल्या रास्त मागण्यांसाठी आरोग्यमित्र कर्मचारी

संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यमित्रांनी

Related News

आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

आरोग्यमित्र कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या पगारात काम करत असल्याने

त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याआधी अनेक वेळा शासनाकडे आपल्या

अडचणी मांडूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.

संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत,

तर हे आंदोलन बेमुदत सुरू राहील. शासनाने त्वरित लक्ष घालावे आणि

आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवा शर्ती सुधाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

सिद्धार्थ इंगोले, आरोग्यमित्र, अकोला“आमच्या वेतनात कोणतीही वाढ नाही,

आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”

वर्षा इंगळे, आरोग्यमित्र, अकोला“आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू.

बेमुदत कामबंद आंदोलन आमच्यासाठी शेवटचा पर्याय आहे.”

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/vigilance-of-local-women-revealed/

Related News