अकोल्यात गणेशोत्सव पूर्वतयारींना गती; सार्वजनिक मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अकोल्यात गणेशोत्सव पूर्वतयारींना गती; सार्वजनिक मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यंदा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सव सनाच्या पूर्वतयारीसाठी अकोल्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव

मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहराचा जिल्हाभरात ठीक ठिकाणी रस्त्यामध्ये पडलेले खड्डे,

लाईट आणि पाण्याची व्यवस्था तसेच रस्त्यावर वाढलेली अतिक्रमण यासोबतच गणेश विसर्जन करताना घाटाची झालेली

दुरावस्था यावर तातडीने कारवाई करून व्यवस्थित करावे.. तसेच गांधीग्राम, बाळापूर आणि काटेपूर्णा इतर

ठिकाणी गणपती विसर्जन करताना त्या ठिकाणची सुद्धा व्यवस्थित गणेश उत्सवापूर्वी करावी यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत

झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सकारात्मक भूमिका घेऊन या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी उपयोजना करण्याचे आदेश

देऊन कारवाई करण्यात येईल अस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला आश्वासित केलं.

Read Also : https://ajinkyabharat.com/encroachment/