अकोल्यात ईद उत्साहात साजरी – ईदगाह मैदानावर हजारोंनी अदा केली विशेष नमाज

अकोल्यात ईद उत्साहात साजरी – ईदगाह मैदानावर हजारोंनी अदा केली विशेष नमाज

रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर आज अकोल्यात ईद-उल-फित्रचा उत्सव

मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. ऐतिहासिक ईदगाह

मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा केली.

Related News

पारंपरिक पोशाख आणि भक्तिभावाने नमाज

पहाटेपासूनच शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठण सुरू होते. मुस्लिम बांधव पारंपरिक पोशाखात –

डोक्यावर हिरवा आणि पांढरा फेटा, पठाणी कुर्ता आणि इस्लामी टोपी अशा वेशभूषेत सामील झाले होते.

ईदगाह मैदानावरचा उत्साह आणि श्रद्धेने भरलेला माहोल बघण्यासारखा होता.

सामूहिक दुआ आणि शुभेच्छांचा आदानप्रदान

मौलाना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नमाज आणि अरबी खुतबा पठणानंतर सामूहिक दुआ करण्यात आली.

नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.

शहरभर उत्साहाचे वातावरण

अकोल्याच्या जुने शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

विविध मशिदींमध्येही हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली.

सर्वत्र आनंद, उत्साह आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.

Related News