अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एक
आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
चोरी झालेल्या मोटारसायकलींचा तपास करत असताना पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली.
त्या आधारे सापळा रचून संबंधित आरोपीला पकडण्यात आले. या दरम्यान आरोपी 23 वर्षीय,
कैलास टेकडी येथील रोहित उमेश जावळे त्याच्याकडून चोरीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपीने शहरातील विविध भागांतून हे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस दलाचे कौतुक केले जात आहे.